Kolhapur News | पोलिसाचा जोतिबाची सासणकाठी नाचवतानाचा व्हिडीओ व्हायरल | Sakal Media
दख्खनचा राजा जोतीबा ची चैत्र यात्रा नेहमीच उत्साहात होते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या तीन राज्यातुन भाविक जोतीबा डोंगरावर येतात. अमाप अशा उत्साहात लाखो भाविक आनंद घेत असतात. या यात्रेच्या बंदोबस्तासाठी पोलीस बंदोबस्त ही मोठा असतो. हे पोलीस ही जोतीबा भक्त असतात. त्यामुळे तेही या यात्रेचा आनंद घेत असतात. शनिवारी झालेल्या यात्रेत एका पोलिसाने जोतीबा ची सासणकाठी नाचवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.यातून च भाविकांप्रमाणे पोलीस ही किती उत्साहात असतात हे दिसत.